माझी शाळेत साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना बालसाहित्यिक बाबुराव शिरसाठ, एम.एच.मगदुम, डॉ.जे.बी. शिंदे, आनंदा यादव, अशोक शेवडे,
माझी शाळेत साने गुरुजी जयंती
कोल्हापूर-12 डिसेंबर
आई हाच गुरु,आई हेच आपल्या ज्ञानाचे विद्यापीठ अशी शिकवण ज्यांनी आपल्याला दिली
म्हणजे साने गुरुजी. बदलत्या कालानुरुप सुसंस्कार व्हावेत असे वाटत असेल तर
प्रत्येक घरातील मुलांनी श्यामची आई हे पुस्तक वाचावे असे प्रतिपादन बालसाहित्यिक
बाबुराव शिरसाठ यांनी केले. ते भोसलेवाडी येथे माझी शाळेत साने गुरुजी
जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत
डॉ.जे.बी. शिंदे होते. यावेळी संस्थापक एम.एच.मगदुम, भरत लाटकर, आनंदा यादव, अशोक शेवडे, मुख्याध्यापक विजय भोगम
उपस्थित होत.
शिरसाठ पुढे म्हणाले खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अपार्व असा समतेचा
संदेश देणारे साने गुरुजी होते. अंतरभारतीची चळवळ उभारणारे साने गुरुजी, पंढरपुराच्या
विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी प्राण पणाला लावणारे
साने गुरुजी, 'साधना' साप्ताहिकाची उभारणी करणे साने गुरुजी, गांधी
हत्येनंतर २१ दिवस उपवास करणारे साने गुरुजी अशी एक ना अनेक रूपे नजरे समोर उभीराहतात. त्यांनी आयुष्यभर देशसेवेचा आणि समाजातील तळागाळातील लोकांच्या विकासाचा विचार केला.सुत्रसंचालन ए.जी.कांबळे, प्रास्ताविक एम.एच.मगदुम, पाहुणे परिचय सागर पाटील व
आभार पी.आर गवळी यांनी मानले.
फोटो ओळ-
माझी शाळेत साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना
बालसाहित्यिक बाबुराव शिरसाठ, एम.एच.मगदुम, डॉ.जे.बी. शिंदे, आनंदा यादव, अशोक शेवडे,

No comments:
Post a Comment