सुंदर मराठी

सुंदर मराठी


शुद्धलेखनाचे अठरा नियम

अनुस्वारासंबंधीचे नियम
नियम १: स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदा- आंबा, चिंच, तंटा, गंगा, निबंध, आनंद

नियम २: य,व,र,ल,श,ष,स, ह, क्ष,ज्ञ यांच्यापूर्वी येणा-या अनुस्वारांबद्दल संस्कृतप्रमाणे शीर्षबिंदू द्यावा.
उदा-संयम, संवाद, संरक्षण, संलग्न, वंशज, दंश, संसार, कंस, सिंह, संक्षिप्त, संज्ञा.

नियम ३: नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्तिप्रत्यय लावताना व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदा- लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे, देशांत, त्यांना, त्यांच्यामुळे.

उपनियम ३: आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.
उदा- राज्यपालांचे, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.

नियम ४: वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पनीने सिद्ध होणारे व न होणारे अनुस्वार देऊ नयेत.
उदा- गांव, नांव, घरें यावर अनुस्वार देऊ नयेत.
    गाव, नाव, घरे असे लिहावे.

र्‍हस्व दीर्घ संबंधी नियम
(ज्याचा उच्चार चटकन,कमी वेळेत होतो.तेथे र्‍हस्व उच्चार करावा.)
नियम ५: तत्सम (संस्कृत) र्‍हस्व इकारान्त आणि उ-कारान्त शब्द प्रथमेत दीर्घान्त लिहावेत.
उदा- कवी, वायू, मृत्यू, शक्ती, भक्ती, उक्ती, गती, मती, शत्रू, बुद्धी,गती

उपनियम ५ एक अक्षरी शब्द दीर्घ लिहावेत.
उदा- मी, ती, ही, जी, की, तू, जू,
अपवाद- आणि , नि, कदापि, परंतु, तथापि, यथामति ही र्‍हस्व लिहावीत.

उपनियम ५- परंतु सामासिक शब्दांमध्ये तत्सम र्‍हस्व इ-कारान्त शब्द व उ-कारान्त शब्द प्रथमपदी आल्यास र्‍हस्व लिहावेत.
उदा- कवी- ‍कविराज,राजकवी, भक्ती- भक्तिभाव, मृत्यू-मृत्युंजय, मती-मतिमंद, गती-गतिमान.

नियम : मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपान्त्य इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावेत.
उदा- किती,चिनी,विटी, सुरु , गुरु, पुढी, गुढी,‍ अतिथी
अपवाद- नीती, रीती, भीती, प्रीती, सुनीता, सुनील,

उपनियम ६: रफारापूर्वी येणारे  इकार व उकार दीर्घ लिहावेत.
उदा- कीर्ती, मूर्ती, तीर्थ, स्फूर्ती, मूर्ती.

नियम : अ-कारान्त शब्दांचे उपान्त्य इ-कार व उ-कार दीर्घ लिहावेत.
उदा- गरीब, चाळीस, वकील, माहीत, जमीन, फूल, चूल, भूल, मूळ, चाहूल, सून, वसूल, लसून, गुण,  ऊस, बहीण,खीर,तूप,गीत,शूर,शून्य,
अपवाद: मंदिर, विष, विश्व, प्रिय, अधिक, विपुल, नाजुक, चतुर, अरुण, तरुण, अखिल, सुख, शुभ, रुंद, अतुल,मित्र, पुण्य.

उपनियम ७: तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामान्यत: र्‍हस्व लिहावेत.
उदा: चिंच, लिंबू, तुरुंग, लिंग, बिंदू, अरविंद,‍ छि:, थु:, दु:ख, नि:शस्त्र

नियम : उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य इकार,उकार अभयवचनी सामान्य रुपांच्या वेळी र्‍हस्व लिहावेत.
उदा: गरीब- गरिबाचे, सून-सुनेचे, वडील- वडिलांचे, वकील-वकिलासाठी, जमीन- जमिनीपासून, फूल- फुलांना,मूल-मुलांसाठी,

अपवाद: शरीर-शरीराचे, गीता-गीतेत, सूत्र-सूत्रात, पूजा- पूजेकरिता, परीक्षा- परीक्षक, वधू परीक्षा.
किरकोळ नियम:
नियम : ‘पूर’ हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना यातील ‘पू’  दीर्घ लिहावा
उदा: कोल्हापूर, नागपूर,सोलापूर कोल्हापुरला

नियम १०: कोणता, एखादा, असे शब्द लिहावेत. कोणचा, एकादा, असे शब्द लिहू नयेत.

नियम ११: हळूहळू,‍ चिरीमिरी,मुळूमुळू यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व चौथे अक्षरे दीर्घान्त लिहावीत.

नियम १२: ‘पूर’ ए-कारान्त नामांचे सामान्यरुप या-कारान्त करावे.
उदा- फडके- फडक्यांना, करणे- करण्यांसाठी

नियम १३: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्यांच्या तोंडी बोलण्याची भाषा वापरावी लागते.त्यावेळी ‍तिचे स्वरुप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे, अन्य व प्रसंगी तसे लिहू नये.
उदा- ‍तिचं बोलणं आवडलं.

नियम १४: कोणत्याही अंत्याक्षराचा पाय मोडू नये.
उदा:विदवान, भगवान,
अपवाद- अन्

नियम १५: केशवसूत पूर्वकालीन व विष्णू शास्त्री चिपूळणकर पूर्वकालीन गदय यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरुन छापावे.

नियम १६: ‘राहणे, पाहणे, वाहणे, अशी रुपे वापरावीत.रहाणे,पहाणे, वहाणे, अशी रुपे वापरु नयेत.आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र राहा,पाहा, वाहा,याबरोबरच रहा, पहा, वहा, अशी रुपे वापरण्यासा हरकत नाही.

नियम १७: ‘ही’ हे अव्यय तसेच ‘आदी’ व ‘ इत्यादी’ ही विशेषणे दीर्घान्तच ‍लिहावीत.


नियम १८: ‘पदयात वृत्ताचे बंधन पाळताना  र्‍हस्व दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढयापुरते स्वातंत्रय असावे. 

No comments:

Post a Comment