Thursday, December 1, 2016

विभागीय क्रिकेट स्पर्धेत ‍सुसंस्कार हायस्कूल प्रथम



विभागीय क्रिकेट स्पर्धेत ‍सुसंस्कार हायस्कूल प्रथम
राज्यस्तीय स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर-१ नोव्हेबर
सातारा येथे झालेल्या १४ वर्षाखालील विभागीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‍कदमवाडी कोल्हापूर येथील सुसंस्कार हायस्कूलने क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. या संघाची रत्नागिरी येथे होणाया राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघाने सातारा येथे सलग तीन सामने जिकून प्रथम क्रमांक पटकविला.‍अंतिम सामन्यात सुसंस्कार हायस्कूलने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांत 168 धावा केल्या. तर सातारा संघाचा वीस षटकांत केवळ 81 धावात डाव गुंडाळला.सुसंस्कार हायस्कूलने 87 धावाने विजय संपादन केला. संघातील यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे अभिनंदन गायकवाड, आदर्श माळी, श्रेयस चव्हाण, आदित्य पाटील, करण वाघमोडे, आदित्य पिसाळ,हर्ष श्रीवास्तव, हर्षजित पाटील,सुधाशु रसाळ,विश्वजित लाटकर,‍ अमित निलमनवर, गणेश मगदुम, प्रणव शिंदे, अनुष भोपले, सुदर्शन कुंभार विजयी संघास संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक विजय भोगम, क्रीडा शिक्षक युवराज पाटील, संजय सुतार, आशपाक मगदुम यांचे मार्गदर्शन लाभले.



फोटो ओळ-
सातारा येथे झालेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत ‍सुसंस्कार हायस्कूलच्या यशस्वी विदयार्थी सोबत संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापक विजय भोगम, सौ.अरुणा हुल्ले क्रीडा शिक्षक युवराज पाटील, संजय सुतार, आशपाक मगदुम


No comments:

Post a Comment