Thursday, November 24, 2016

-- पृथ्वीचे शोकगीत --

-- पृथ्वीचे शोकगीत --

*
संगीत रचना - अशोक वायगणकर 
*
गीत - विलास जैतापकर

हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे 
ही वसुंधरा जनसंखेच्या भाराने रडते आहे ||धृ||
पृथ्वीच्या पाठीवरती ही अफाट झाली गर्दी 
गर्दीतच जन गुदमरती, दु :खात किती तळमळती 
हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर छळते आहे ||||
या नद्या नव्हे रे गंगा संजीवन तुजला देती 
तू करुनी जल अपवित्र का पाप घेतसे माथी 
हे पात्र नद्यांचे सुखमय कर दुसरीकडे वळते आहे ||||
हा पावन निर्मल वारा, जो श्वास तुझा रे होतो 
तू दूषित करुनी त्याला, विश्वास कसा गमवितो
हे दु :ख अनावर धरणीला रे अविरत सलते आहे ||||
ही झाडे तुजला देती रे उन्हात शीतल छाया 
अन मधुर फळे पुरविती रे जीव तुझा जगवाया
हि कुरहाड झाडांवरती नाही तुजवर पडते आहे ||||
ही पुन्हा हसावी धरणी, पक्ष्यांनी गावी गाणी 
धावे कर्तव्य म्हणुनी, ही बिरादरी इन्सानी 
या अभियानात सामील व्हा, ज्यांना हे कळते आहे ||||


2 comments:

  1. ही डोंगर तरुची राणे, ही फळे फुले अन पाने
    हे नद्या झऱ्यांचे गाणे, निर्मिले सुखस्ताव त्याने
    हे रवीचंद्राचे तेज आता का रे मावळते आहे।।

    ReplyDelete
  2. ही डोंगर तरुची राणे, ही फळे फुले अन पाने
    हे नद्या झऱ्यांचे गाणे, निर्मिले सुखस्ताव त्याने
    हे रवीचंद्राचे तेज आता का रे मावळते आहे।।

    ReplyDelete