Sunday, October 16, 2016

वि.स.खांडेकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

वि.स.खांडेकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भाऊसाहेब तथा वि.स.खांडेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. टाकाळा येथील त्यांच्या पुतळयास खांडेकर यांच्या कन्या सौ.सुलभा कापडी व जावई डॉ.चंद्रहास कापडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्प करण्यात आले. कदमवाडी भोसलेवाडी येथील सुसंस्कार ‍शिक्षण मंडळ संचलित सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळा, साने गुरुजी सामाजिक सेवा संस्था व राजर्षी शाहु वाचनालय यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सुसंस्कार हायस्कूलच्या गीतमंचच्या  वतीने खांडेकर यांनी लिहिलेले घरी एकच पणती मिणमिणती’’ हे समूहगीत गायिले. यावेळी संस्थापक एम.एच.मगदुम, सुरेश शिपुरकर, एम.एस.पाटोळे, भरत लाटकर,अशोक शेवडे, हसन देसाई,सुनीलकुमार सरनाईक,यांनी भाऊंच्या आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमास मुख्याध्यापक विजय भोगम,माझी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले, अशोक चौगुले, नंदकुमार डोईजड, वसंत पाठक, कुमार सिदनाळे, अशोक कांबळे, विजय घाटगे, संजय सुतार, गुलाब अत्तार, अरुण कांबळे, सागर पाटील, गजानन गुरव, सुहास खतकर, सुरज गायकवाड, आशपाक मगदुम, भगवान कांबळे व विदयार्थी उपस्थित होते.

                                               कोल्हापूर:२ सप्टेंबर २०१६

No comments:

Post a Comment