Sunday, January 8, 2017

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात


अभिनव बालक मंदिर या शाळाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण 
समारंभ मार्गदर्शन करताना डॉ.साईप्रसाद व इतर मान्यवर
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात 

अभिनव बालक मंदिर या शाळाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे राष्टसेवादलाचे टस्टी डॉ.सुरेश खैरनार, अध्यक्षस्थानी डॉ.साईप्रसाद होते. कार्यक्रमास संस्थापक एम.एच.मगदुम, चिटणीस रियाज मगदुम, उपाध्यक्ष अखलाख अन्सारी, जे.बी.शिंदे, डॉ.अब्दुलखालीक खान, सौ.सुहासिनी वठारकर,वसंत पाठक, बाळासाहेब गवाणी,भरत लाटकर उपस्थित होते.
डॉ.साईप्रसाद म्हणाले- वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विदयार्थ्यांच्या अंगी असणारे कला, क्रीडा, साहित्य, नृत्य, गायन याबरोबरच बुध्दीमता प्रकट करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो. विदयार्थ्यांनी या माध्यमाचा उपयोग देश उभारणीसाठी करावा.
शाळेतील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच विदयार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करुन जुन्या-नव्या बहारदार गीतांवर नृत्य करत पालकांचे चांगलेच मनोरंजन केले. रांगोली कलादालनाचे उदघाटन नगरसेविका सौ.अर्चना पागर, कार्यानुभव कलादालनाचे उदघाटन नगरसेविका सौ.सुरमंजिरी लाटकर,तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेविका सौ.कविता माने यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन सौ.प्रज्ञा पावसकर,संस्था अहवाल वाचन माझी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले तर आभार सुसंस्कार हायस्कूलचे मुख्याध्यापक ‍विजय भोगम यांनी मानले.                                     4   जानेवारी2017

No comments:

Post a Comment