Friday, January 20, 2017

sanjay kalake


माझा वाढदिवस 

"मित्रांनो "....माझा वाढदिवस (दि.20-जानेवारी ) आपल्या शुभेच्छा what's up, facebook, sms आणि phone calls च्या माध्यमातून मिळाल्या आणि मी अक्षरशः निःशब्द झालो. 
"आपण दिलेल्या *"शुभेच्छा व् आशीर्वाद"* अनमोल आहेत"
 " प्रोस्ताहन पर शुभेच्छा मला पुढील वाटचाल करण्यासाठी मोलाच्या ठरतील" 
"असेच प्रेम -आशीर्वाद सदैव पाठीशी राहुद्यात"..
* मनःपूर्वक आभार"*. 

संजय कळके


Sunday, January 15, 2017

काही महत्वाची

काही महत्वाची एकके :
कॅलरी - उष्णता मोजण्याचे एकक
 पौंड - वजन मोजण्याचे एकक
 बार - वायुदाब मोजण्याचे एकक
 अँगस्ट्रॉंम - प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक
 प्रकाशवर्ष - तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक
 फॅदम - समुद्राची खोली मोजण्याचे एकक
 नॉट - सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक
 अॅम्पीअर - विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक
 हर्टझ - विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक
 मैल - अंतर मोजण्याचे एकक
 एकर - जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक
 दस्ता - कागदसंख्या मोजण्याचे एकक
 हॉर्सपॉवर - स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक
 वॅट - शक्तीचे एकक
 रोएंटजेन - क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
 गाठ - कापूस गाठी मोजण्याचे एकक
 हँड - घोड्याची उंची मोजण्याचे एकक
 मायक्रोन - लांबीचे वैज्ञानिक एकक

मूलद्रव्ये व संज्ञा :
अॅल्युमिनियम - A1
 बेरीअम - Ba
 कोबाल्ट - Co
 आयोडीन - I
 मॅग्नेशिअम - Mg
 मॅग्नीज - Mn
 निकेल - Ni
 फॉस्फरस - P
 रेडीअम - Ra
 सल्फर - S
 युरेनिअम - U
 झिंक - Zn
 चांदी - Ag
 सोने - Au
 तांबे - Cu
 लोखंड - Fe
 पारा - Hg
 शिसे - Pb
 कथिल - Sn
 टंगस्टन - W

खनिजद्रव्य व त्याचे उपयोग :
शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.
खनिज - फॉस्फरस  -
उपयोग - हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता
 
अभावी होणारे परिणाम - हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात
 
स्त्रोत - अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या
खनिज - पोटॅशियम-
उपयोग - चेतापेशीच्या पोषणाकरिता
 
अभावी होणारे परिणाम - चेतापेशीवर परिणाम होतो
 
स्त्रोत - सुकी फळे
खनिज - कॅल्शियम-
उपयोग - हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता
 
अभावी होणारे परिणाम - हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.
 
स्त्रोत - तीळ व पालेभाज्या
खनिज - लोह-
उपयोग - रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.
 
अभावी होणारे परिणाम - लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  
 
स्त्रोत - हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी
खनिज - तांबे-
उपयोग - हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
 
अभावी होणारे परिणाम - तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.
 
स्त्रोत - पालेभाज्या
खनिज - सल्फर-
उपयोग - प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य
 
अभावी होणारे परिणाम - केस, हाडे कमकूवत होतात
खनिज - फ्लोरिन-
उपयोग - दातांचे रक्षण करण्याकरिता,
 
अभावी होणारे परिणाम - याच्या अभावी दंतक्षय होतो.
खनिज - सोडीयम-
उपयोग - रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.
 
अभावी होणारे परिणाम -  रक्तदाबावर परिणाम होतो.  
खनिज - आयोडीन  -
उपयोग - थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता
 
अभावी होणारे परिणाम - गलगंड नावाचा आजार होतो.

अन्नपचन प्रक्रिया :
सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.
 
अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात. या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते. या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.
 
खलेल्ले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो.
 
अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.
 
1.
अंग पदार्थ - मुख व गुहा
स्त्राव - लाळ  
 
विकर - टायलिन
 
माध्यम - अल्पांशाने
 
मूळ अन्न पदार्थ - पिष्टमय पदार्थ  
 
क्रिया आणि अंतिम - शर्करा (माल्टोज)
2. अंग पदार्थ - जठर
स्त्राव - हायड्रोक्लोरिक
 
माध्यम - आम्ल, अॅसिड  
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिने  
 
क्रिया आणि अंतिम - जंतुनाशक
3. अंग पदार्थ - जठररस  
स्त्राव - पेप्सीन,रेनीन
 
माध्यम - आम्ल
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिने, दूध
 
क्रिया आणि अंतिम - सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर 
4. अंग पदार्थ - लहान आतडे
स्त्राव - पित्तरस
 
माध्यम - अल्कली
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिने व मेद
 
क्रिया आणि अंतिम - मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे
5. अंग पदार्थ - स्वादुपिंडरस  
विकर - ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ
 
माध्यम - अल्कली, अल्कली
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद
 
क्रिया आणि अंतिम - अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल
6. अंग पदार्थ - आंत्ररस
विकर - इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ
 
माध्यम - अल्कली
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिने, शर्करा, मेद  
 
क्रिया आणि अंतिम - अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल
प्रमुख पदावरील व्यक्ती :
भारताचे राष्ट्रपती
डॉ. राजेंद्र प्रसाद  -
26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  -
13 मे 1962 ते 13 मे 1967
डॉ. झाकीर हुसेन -
13 मे 1967 ते 3 मे 1969
डॉ. वराह व्यंकट गिरी (कार्यकारी) -
20 मे 1969 ते 20 जुलै 1969
न्या. महंमद हिदायतुल्ला (कार्यकारी)
- 20 जुलै 1969 ते 21 ऑग. 69
डॉ. वराह व्यंकट गिरी -
24 ऑग. 1969 ते 24 ऑग. 1974
फक्रुद्दीन अली अहमद -
24 ऑगस्ट 1974 ते फेब्रु. 1977
बी.डी. जत्ती (कार्यकारी) -
11 फेब्रु1977 ते 25 जुलै 1977
डॉ. नीलम संजीव रेड्डी -
25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982
ग्यानी झैलसिंग -
25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987
राधास्वामी व्यंकटरमण  -

25
जुलै 1987 ते 25 जुलै 1992
डॉ. शंकरद्याल शर्मा -
25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997
के.आर. नारायणन  -
25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम -
25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007
श्रीमती प्रतिभाताई पाटील -
25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012
प्रणव मुखर्जी -
25 जुलै 2012 ते पासून कार्यरत
भारताचे पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू  -
15 ऑगस्ट 1947 ते 26 मे 1964
श्री. गुलझारीलल नंदा  -
27 मे 1964 ते 9 जून 1964 (13 दिवस कार्यवाह)
श्री. लालबहादूर शास्त्री -
9 जून 1964 ते 11 जाने. 1966
श्री. गुलझारीलाल नंदा (कार्यावह) -
11 जाने. 1966 ते 24 मार्च 1966
श्रीमती इंदिरा गांधी -
24 जाने. 1966 ते 24 मार्च 1977
श्री. मोरारजी देसाई -
24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
श्री. चरणसिंग -
28 जुलै 1979 ते 14 जाने. 1980
श्रीमती इंदिरा गांधी -
14 जाने. 1980 ते 31 ऑक्टो. 1984
श्री. राजीव गांधी -
31 ऑक्टो. 1984 ते 2 डिसें. 1989
श्री. व्ही.पी. सिंग -
2 डिसेंबर 1989 ते 7 नोव्हे. 1990
श्री. चंद्रशेखर -
10 नोव्हे. 1990 ते 21 जून 1991
श्री. पी.व्ही. नरसिंहराव -
21 जून 1991 ते 15 मे 1996
श्री. अटलबिहारी वाजपेयी -
16 मे 1996 ते 28 मे 1996
श्री. एच.डी. देवेगौडा -
1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
श्री. इंद्रकुमार गुजराल -
21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
श्री. अटलबिहारी वाजपेयी -
19 मार्च 1998 ते 22 मे 2004
श्री. मनमोहन गुरूमित सिंग -
22 मे 2004 ते 26 मे 2014
श्री. नरेंद्र मोदी -

26 मे 2014 पासून कार्यरत.

Sunday, January 8, 2017

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात


अभिनव बालक मंदिर या शाळाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण 
समारंभ मार्गदर्शन करताना डॉ.साईप्रसाद व इतर मान्यवर
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात 

अभिनव बालक मंदिर या शाळाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे राष्टसेवादलाचे टस्टी डॉ.सुरेश खैरनार, अध्यक्षस्थानी डॉ.साईप्रसाद होते. कार्यक्रमास संस्थापक एम.एच.मगदुम, चिटणीस रियाज मगदुम, उपाध्यक्ष अखलाख अन्सारी, जे.बी.शिंदे, डॉ.अब्दुलखालीक खान, सौ.सुहासिनी वठारकर,वसंत पाठक, बाळासाहेब गवाणी,भरत लाटकर उपस्थित होते.
डॉ.साईप्रसाद म्हणाले- वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विदयार्थ्यांच्या अंगी असणारे कला, क्रीडा, साहित्य, नृत्य, गायन याबरोबरच बुध्दीमता प्रकट करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो. विदयार्थ्यांनी या माध्यमाचा उपयोग देश उभारणीसाठी करावा.
शाळेतील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच विदयार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करुन जुन्या-नव्या बहारदार गीतांवर नृत्य करत पालकांचे चांगलेच मनोरंजन केले. रांगोली कलादालनाचे उदघाटन नगरसेविका सौ.अर्चना पागर, कार्यानुभव कलादालनाचे उदघाटन नगरसेविका सौ.सुरमंजिरी लाटकर,तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेविका सौ.कविता माने यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन सौ.प्रज्ञा पावसकर,संस्था अहवाल वाचन माझी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले तर आभार सुसंस्कार हायस्कूलचे मुख्याध्यापक ‍विजय भोगम यांनी मानले.                                     4   जानेवारी2017

Monday, January 2, 2017

मी सावित्री बोलतेय कार्यक्रम शाहू स्मारक कोल्हापूर.
 मी सावित्री बोलतेय कार्यक्रम शाहू स्मारक कोल्हापूर.
मी सावित्री बोलतेय कार्यक्रम शाहू स्मारक कोल्हापूर.

Sunday, January 1, 2017

राज्यस्तरीय किक्रेट स्पर्धेत ‍सुसंस्कार हायस्कूलला कास्य पदक

रत्नागिरी येथे झालेल्या राज्य क्रिकेट स्पर्धेत ‍सुसंस्कार हायस्कूलच्या यशस्वी विदयार्थी सोबत संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापक विजय भोगम, सौ.अरुणा हुल्ले क्रीडा शिक्षक युवराज पाटील, संजय सुतार

राज्यस्तरीय किक्रेट स्पर्धेत ‍सुसंस्कार हायस्कूलला कास्य पदक

कोल्हापूर-1 जानेवारी
रत्नागिरी येथे झालेल्या १४ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‍कदमवाडी कोल्हापूर येथील सुसंस्कार हायस्कूलने क्रिकेट स्पर्धेत कांस्यपदक पटकविल. अमरावती संघाचा 36 धावाने पराभव केला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट राज्य पुणे व जिल्हा ‍क्रीडा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले. संघातील खेळाडूना शिल्ड, प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले. संघातील यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे अभिनंदन गायकवाड, आदर्श माळी, श्रेयस चव्हाण, आदित्य पाटील, करण वाघमोडे, आदित्य पिसाळ,हर्ष श्रीवास्तव, हर्षजित पाटील,सुधाशु रसाळ,विश्वजित लाटकर,‍ अमित निलमनवर, गणेश मगदुम, प्रणव शिंदे, अनुष भोपले, सुदर्शन कुंभार विजयी संघास संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक विजय भोगम, क्रीडा शिक्षक युवराज पाटील, संजय सुतार, यांचे मार्गदर्शन लाभले.