Thursday, November 24, 2016

-- पृथ्वीचे शोकगीत --

-- पृथ्वीचे शोकगीत --

*
संगीत रचना - अशोक वायगणकर 
*
गीत - विलास जैतापकर

हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे 
ही वसुंधरा जनसंखेच्या भाराने रडते आहे ||धृ||
पृथ्वीच्या पाठीवरती ही अफाट झाली गर्दी 
गर्दीतच जन गुदमरती, दु :खात किती तळमळती 
हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर छळते आहे ||||
या नद्या नव्हे रे गंगा संजीवन तुजला देती 
तू करुनी जल अपवित्र का पाप घेतसे माथी 
हे पात्र नद्यांचे सुखमय कर दुसरीकडे वळते आहे ||||
हा पावन निर्मल वारा, जो श्वास तुझा रे होतो 
तू दूषित करुनी त्याला, विश्वास कसा गमवितो
हे दु :ख अनावर धरणीला रे अविरत सलते आहे ||||
ही झाडे तुजला देती रे उन्हात शीतल छाया 
अन मधुर फळे पुरविती रे जीव तुझा जगवाया
हि कुरहाड झाडांवरती नाही तुजवर पडते आहे ||||
ही पुन्हा हसावी धरणी, पक्ष्यांनी गावी गाणी 
धावे कर्तव्य म्हणुनी, ही बिरादरी इन्सानी 
या अभियानात सामील व्हा, ज्यांना हे कळते आहे ||||


Friday, November 11, 2016

आरोग्य मार्गदर्शन व्याख्यान



आरोग्य मार्गदर्शन व्याख्यान

संपूर्ण कुटुंबाची रक्त तपासणी X ray,M.R.I.इत्यादी 50% सवलतीच्या दरात---
    होप मुव्हमेंट इंडिया व योगवर्ग शाखा कुशिरे यांच्या सौजन्याने सोमवार दि. 14.11.2016 रोजी संध्या.6 वा. हनुमान मंदिर कुशिरे येथे या योजनेबाबत सोशल वेलफेअर ऑफिसर श्री.प्रफुल्लकुमार हुपरीकर याचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. तरी आपण उपस्थित राहून सदर योजनेचा लाभ घ्यावा.
आयोजक: योगवर्ग शाखा कुशिरे

Sunday, November 6, 2016

‍दिवंगत नर्गीस मगदुम यांचा स्मृतिदिन साजरा


नर्गीस मगदुम यांच्या स्मतिदिना निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना भरत लाटकर, अशोक शेवडे, बाळासाहेब गवाणी, अरविंद मेंढे, मिरासाहेब मगदुम आदी.

‍दिवंगत नर्गीस मगदुम यांचा स्मृतिदिन साजरा
      कदमवाडी भोसलेवाडी येथील सुसंस्कार शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा ‍दिवंगत नर्गीस मगदुम यांच्या स्मतिदिना निमित्त मगदुम परिवारमार्फत गरीब कुटुंबाला तीन हजाराची मदत तसेच सानेगुरुजी सामाजिक सेवा संस्थेला तेरा हजार रुपये देण्यात आले.
यावेळी माजी महापौर शिवाजीराव कदम, भिमराव पोवार, भरत लाटकर, अशोक शेवडे, वसंत पाठक, नंदकुमार डोईजड, सौ.सुहासिनी वठारकर, सुनिलकुमार सरनाईक, अशोक कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास नगरसेविका सौ.सिमा कदम, अखलाख अन्सारी, बाळासाहेब गवाणी, संतोष पाटील,‍ अरविंद मेंढे, मिरासाहेब मगदुम, रियाज मगदुम, डॉ.अब्दुलखालीक खान, इरफान अन्सारी, मुख्याध्यापक विजय भोगम, मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले यांच्यासह सुसंस्कार हायस्कूल,माझी शाळेचे सर्व शिक्ष्‍क, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन गुलाब अत्तार यांनी केले.