Wednesday, December 5, 2018

संजय कळके यांना नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार


  सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी येथील शिक्षक संजय कळके व सौ. राणी कळके यांना नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार देताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रशासानाधिकारी शंकर यादव व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरीटेजचे प्रेसिडिंट हर्षवर्धन तायवाडे पाटील, सेक्रेटरी राहूल गांधी, असिस्टंट गव्हर्नर प्रसन्ना देशिंगकर, 




संजय कळके यांना नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार

कोल्हापूर- दि.५ डिसेंबर २०१८
            सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी शाळेचे गणित विज्ञान व तंत्रस्नेही शिक्षक संजय पंडित कळके यांना रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत दिला जाणारा “नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार” देवून गौरविण्यात आले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रशासानाधिकारी शंकर यादव व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरीटेजचे प्रेसिडिंट हर्षवर्धन तायवाडे पाटील, सेक्रेटरी राहूल गांधी, असिस्टंट गव्हर्नर प्रसन्ना देशिंगकर, रोटेरियन अमर पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना शाळेचे संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापक विजय भोगम यांचे मार्गदर्शन लाभले. रेसिडन्सी हॉल ताराबाई पार्क कोल्हापूर येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमास डॉ.अभिजीत वज्रमुष्टी, प्रशांत मेहता, मिलिंद करमळकर, किशोर परमार, भरत जाधव, समीर काळे, राहूल गद्रे, सुखराज ओसवाल, धनंजय थोरात, रोहन सावंत, राहूल बुरगे, कुमार परमार व इतर रोटरी सदस्य उपस्थित होते.
      श्री.कळके यांनी गेली पंधरा वर्षे कृतीयुक्त शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम राबवत गणित-विज्ञान विषयाचे अध्यापन करत इयत्ता दहावीनिकालाचा गुणवत्तापूर्ण   चढता आलेख ठेवला आहे. तसेच स्काऊट गाईड या विषय अंतर्गत त्यांच्या दहा विदयार्थ्याना राज्यपाल पुरस्कार मिळाला आहे. तसेच ते शाळेत तंत्रस्नेही शिक्षक म्हणून काम पाहत आहे. .     

            रोटरीने पोलिओ निर्मूलन नंतर मोठया प्रमाणावर हाती घेतलेले मिशन टीच याचा एक भाग आहे. टी फॉर टीचर ट्रेनिग, यामध्ये शिक्षकांना वेगवेगळया प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. अध्यावत ई लर्निग, प्रौढ शिक्षणासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. शाळा बाहय मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी रोटरी कार्य करत आहे. हॅपी स्कूल अंतर्गत मुलांसाठी बेंच, क्रीडा साहित्य, शाळेचे रंग काम आदी रोटरी क्लब मार्फत केले जाते.
            टीच मिशन अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक शाळेतील  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना रोटरी राष्ट्रबांधणीचे शिल्पकार शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरहुन्नरी शिक्षकांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहित करुन रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत दिला जाणारा नेशन बिल्डर पुरस्कारासाठी कोणतेही शिफारसपत्र  किंवा अर्ज दयावा लागत नाही. यामध्ये एक प्रकार असा आहे की मुले शिक्षकांना मार्क देतात. राजकारण विरहित हा पुरकार दिला जातो हे या पुरस्काराचे वैशिष्टय आहे.
फोटो ओळ-
      सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी येथील शिक्षक संजय कळके व सौ. राणी कळके यांना नेशन बिल्डर आदर्श शिक्षक पुरस्कार देताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रशासानाधिकारी शंकर यादव व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरीटेजचे प्रेसिडिंट हर्षवर्धन तायवाडे पाटील, सेक्रेटरी राहूल गांधी, असिस्टंट गव्हर्नर प्रसन्ना देशिंगकर,