Sunday, July 16, 2017

संजय कळके



स्वातंत्रदिन उत्साहात साजरा
कोल्हापूर-
 भोसलेवाडी कदमवाडी येथील सुसंस्कार शिक्षण मंडळ संचलित माझी शाळा, सुसंस्कार हायस्कूल, अभिनव बालक मंदिर यांच्या संयुक्तपणे 71 वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सैनिक संतोष दादू पाटील यांच्या  हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी सुसंस्कार शिक्षण मंडळाचे संस्थापक एम.एच.मगदुम, सचिव रियाज मगदुम, संचालक डॉ. अब्दुलखालिक खान, भरत लाटकर, नगरसेविका सौ. कविता माने, बाळासाहेब गवाणी, चंदसेन जाधव, अशोक शेवडे, अशोक चौगले, मुख्याध्यापक विजय भोगम, माझी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा हुल्ले यांच्यासह संस्थेचे सर्व ‍पदाधिकारी, ‍शिक्षक, कर्मचारी व विदयार्थी  उपस्थित होते.



स्वतंत्रदिना निमित्त विदयार्थ्याना शालेय युनिफॉर्मचे वाटप
कोल्हापूर-
स्वतंत्रदिना निमित्त माझी शाळा, सुसंस्कार हायस्कूल, अभिनव बालक मंदिर  या शाळेतील शंभरपेक्षा अधिक गरीब व गरजू विदयार्थ्याना शालेय युनिफॉर्मचे वाटप माजी सैनिक संतोष पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले. साने गुरुजी सामाजिक सेवा संस्था व शाळेतील ‍शिक्षक, कर्मचारी यांच्या संयुक्तपणे हे शालेय युनिफॉर्म विदयार्थ्याना देण्यात आले.
यावेळी साने गुरुजी सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष एम.एच.मगदुम, संचालक अशोक चौगले, चंद्रसेन जाधव, बाळासाहेब गवाणी,चिटणीस के.ए. सिदनाळे, सुसंस्कार शिक्षण मंडळाचे सचिव रियाज मगदुम, संचालक डॉ. अब्दुलखालिक खान, भरत लाटकर, मुख्याध्यापक विजय भोगम, माझी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा हुल्ले यांच्यासह संस्थेचे सर्व ‍पदाधिकारी, ‍शिक्षक, कर्मचारी व विदयार्थी  उपस्थित होते.












Sunday, July 9, 2017

माझी शाळेत गुणवंत ‍विदयार्थ्यांचा सत्कार

 भोसलेवाडी येथील माझी शाळेत गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार करताना महापौर हसिना फरास, डॉ. बी.एम.‍ हिर्डेकर, संस्थापक एम.एच.मगदुम, नगरसेविका सौ.सिमा कदम, क‍विता माने, स्मिता माने, अर्चना पागर,

माझी शाळेत गुणवंत ‍विदयार्थ्यांचा सत्कार
कदमवाडी भोसलेवाडी येथील माझी शाळेच्या गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास तर प्रमुख पाहुणे कुलसचिव डॉ.बी.एम.हिर्डेकर होते. पाचवी शासकीय स्कॉलरशिप परीक्षेमध्ये राज्यात तेरावी आलेली विदयार्थीनी सुरेखा कस्तुरे ,जिल्हा यादीत आलेले आठ विदयार्थी तसेच दहावी परीक्षेत गुणाक्रमे उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्याचा व त्यांच्या पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थापक एम.एच.मगदुम, भागातील नगरसेविका सौ.सिमा कदम, क‍विता माने, स्मिता माने, अर्चना पागर, अखलाख अन्सारी, सौ.सुहासिनी वठारकर, बाळासाहेब गवाणी, हसन देसाई, भरत लाटकर, वसंत पाठक, सुनीलकुमार सरनाईक, डॉ.जे.बी.‍शिंदे, संतोष पाटील, चंद्रसेन जाधव, मुख्याध्यापक विजय भोगम, माझी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले, सर्व शिक्षक, शिक्षकत्तरे कर्मचारी यांच्यासह भागातील पालक व मान्यवर उपस्थितीत होते.
     यावेळी डॉ.बी.एम. हिर्डेकर म्हणाले माझी शाळेचे घोषवाक्य असे आहे, आम्हाला कोणत्याही दर्जाचे मुल दया त्याला आम्ही उत्तम दर्जाला नेवून ठेवू. त्याला चांगला नागरिक करु. गुणवत्तापूर्ण शिक्षण देउन चांगल्या दर्जाचे तरुण तयार करणे हे शाळेचे वैशिष्टये आहे. नविने आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आजच्या मुलांच्या मन, मेंदू आणि मनगटात आहे. आजचा विदयार्थी काळाची पावले ओळखून ते आव्हान पेलू पहात आहे. त्याच्या सामर्थ्याला आणि बौध्दिकतेला बळ देण्याचे काम माझी शाळा करत आहे. विदयार्थ्यांनी जागतिक पातळीवर चमकण्याचा प्रयत्न करावा. आपले ज्ञान नेहमी अदयावत करुन आव्हानात्मक संधीना सामोर जा. त्यासाठी थोरामोठयांची आत्मचरित्रे वाचा ती नेहमी प्रेरणादायी ठरतील असेही त्यांनी सांगितले.
     यावेळी स्कॉलरशीप मार्गदर्शक ‍शिक्षिका सौ. मनिषा खवणेकर यांचा पालकांनी सत्कार केला. तसेच शाळेत वर्षभर रजा न काढलेले व जादा रविवार अध्यपन  केलेल्या शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. स्वागत व प्रास्ताविक संस्थापक एम.एच.मगदुम, सुत्रसंचालन सागर पाटील तर आभार अशोक कांबळे यांनी मानले.
 चौकट-

स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात तेरावी आलेली सुरेखा कस्तुरे या विदयार्थीनीच्या पालकांची आर्थीक परिस्थिती गरीब असल्याने ती पदवीधर होईपर्यंत तिचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे डॉ.हिर्डेकर यांनी सांगितले.