Wednesday, October 19, 2016

शालेय क्रिकेट स्पर्धेचे ‍सुसंस्कार हायस्कूला विजेतेपद


शालेय क्रिकेट स्पर्धेचे ‍सुसंस्कार हायस्कूला विजेतेपद 
विभागीय स्पर्धेसाठी निवड


कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या १४ वर्षाखालील जिल्हास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‍कदमवाडी येथील सुसंस्कार हायस्कूलने क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. या संघाची सातारा येथे होणाया विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मेरीवेदर ग्राउंडवर झालेल्या अंतिम सामन्यात सुसंस्कार हायस्कूलने सेंट झेव्हीअर्सवर २३ धावाने मात केली. यामध्ये सुसंस्कार हायस्कूलने प्रथम फलंदाजी करताना आठ षटकांत ७२ घावा केल्या. तर सेंट झेव्हीअर्सचा डाव आठ षटकांत ४९ धावात गुंडाळला. श्रेयस चव्हाण यांने अष्टपैलू कामगि री केली. करण वाघमोडे, आदर्श माळी, अभिनंदन गायकवाड यांनी उलेखनिय कामगीरी केली. पंच म्हणून भरत माने, अशोक भापकर,यांनी काम ‍पाहिले.स्पर्धेचे संयोजन सचिन पांडव व शिवाजी कामते यांनी केले.
विजयी संघ अभिनंदन गायकवाड (कर्णधार), आदित्य पाटील, श्रेयस चव्हाण, आदर्श माळी, हर्ष् श्रीवास्तव, करण वाघमोडे,‍ अमित निलमनवर, गणेश मगदुम, प्रणव शिदे, आदित्य पिसाळ,सुधाशु रसाळ,विश्वजित लाटकर,अनुज भोपळे,‍ अनिल हेगडे 
सदर संघास संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक विजय भोगम, क्रीडा शिक्षक युवराज पाटील, संजय सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

Monday, October 17, 2016

पोहाळे लेण्यांचे सौंदर्य मोहविणारे


पोहाळे लेण्यांचे सौंदर्य मोहविणारे
(19 Jul 2016)
 पोहाळे तर्फ आळते :
 डोंगर उतारावरून धावणारे पाण्याचे ओहोळ, आसमंत भेदणारी मोरांची साद, लेण्यातून दिसणारे निसर्गाचे सौंदर्य या सर्वांची अनुभूती घ्यायची असेल तर पोहाळे लेणी पावसाळी पर्यटन एकदा करायलाच हवे. कोल्हापूरपासून १५ कि.मी. अंतरावर वडणगे, निगवे, कुशिरे, पोहाळे व पोहाळेतून गिरोली घाटमार्गे जाणाऱ्या जोतिबा रस्त्यावर एका कडेला ही लेणी आहेत. लेण्यांपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर जोतिबा मंदिर आहे. या लेण्यांना साधारणपणे दोन हजार वर्षांचा वारसा आहे. मध्यंतरीच्या काळात या लेण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने येथे ओल्या पार्ट्या, फिरस्त्यांचे व प्रेमीयुगुलांच्या बसण्याचे ठिकाण झाले होते. या परिसरात पाऊस जास्त असल्यामुळे या लेण्यांमध्ये पाणी झिरपत असायचे. पाणी एवढे झिरपायचे की, आत छोटे तळेच व्हायचे व पावसाळा संपल्यावरही पाणी ठिबकत राहायचे. यामुळे ही लेणी दुर्लक्षितच राहिली होती. भारतीय पुरातत्त्व खात्याने या लेण्यांची डागडुजी केली आणि या लेण्यांना पुन्हा एकदा झळाळी मिळाली. लेण्यांवर सिमेंट व काही रसायनांची फवारणी केली. त्यामुळे त्यावर एक आवरण तयार होऊन झिरपणारे पाणी बंद झाले. लेण्यातील पडलेले खांब तसेच जीर्ण झालेल्या फरशा बदलून पूर्वीच्या बांधकामाला एकरूप होईल, असे बदल करण्यात आले आहेत. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी फरीद शहा यांनी यासाठी कर्नाटकातील बदामी येथून जांभा दगड मागविला आणि या लेण्यांचा चेहरामोहरा बदलून टाकला. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली लेण्यांमध्ये जांभ्या दगडातील १४ खांब परत बसवून लेण्यांच्या छताला आधार देण्यात आला. तसेच लोखंडी दरवाजे व खिडक्या बसविल्या आहेत. तसेच तेथे देखरेखीसाठी कायमचा सेवक ठेवलेला असल्याने वर्षा पर्यटनासाठी हे ठिकाण साद घालत आहे. वृक्षारोपण गरजेचे काही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीमुळे या परिसरातील वृक्ष जळाले आहेत. या परिसरात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. तसेच या परिसरात दुर्मीळ पक्षी व प्राण्यांचे वास्तव्य असल्याने निसर्गसंपदाचे जतन होणे आवश्यक आहे.


Sunday, October 16, 2016

You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins

You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...
you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...

https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.

पद्धत :- 1 (Method 1)
वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

      आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की...

तयार झालेला नवीन लिंक-
https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :- 2 (Method 2)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...

तयार झालेला लिंक-
https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-3 (Method 3)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.saveyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-4 (Method 4)

मूळ लिंक:-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...

नवीन लिंक:-
pwnyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-5 (Method 5)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

     यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...

नवीन लिंक:-
https://www.kickyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-6 (Method 6)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

       यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"
टाइप करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.deturl.com/watch?v=Jbn39j-xa-k

राष्ट्रीय विज्ञान दिवस -

राष्ट्रीय विज्ञान दिवस -
भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी "रमण एफेक्ट" चा शोध २८ फ़ेब्रुवारी १९२८ मध्ये लावला. त्यांच्या ह्या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आला.
दर वर्षी भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो....येत्या २८ फेब्रुवारी रोजी 'राष्ट्रीय विज्ञान दिना'ला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.
 २८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते - भारतरत्न सर सी. व्ही. रामन यांनी 'रामन इफेक्ट' हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतासाठी पहिले नोबेल पारितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ-संशोधक म्हणजे भारतरत्न सर - चंदशेखर व्यंकट रामन! भौतिकशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा - प्रकाशाच्या विकिरणासंबंधी संशोधन करणारे - आणि ह्याविषयीचा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जागतिक पातळीवर सादर करणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ! २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी सर सी. व्ही. रामन ह्यांनी हा शोधनिबंध जगासमोर मांडला आणि त्याला १९३०मध्ये मान्यता मिळून, भौतिकशास्त्राचा अत्यंत मानाचा नोबेल पुरस्कार त्यांना १९३०मध्ये प्राप्त झाला.

२८ फेब्रुवारी या दिनाचे वैज्ञानिक औचित्य साधून १९८७ पासून, भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. म्हणजेच साधारण श्री. रामन यांच्या जन्मशताब्दीच्या आसपास! रामन यांचा जन्म नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. अत्यंत तल्लख बुद्धीच्या - रामन यांनी वयाच्या ११व्या वषीर्च शालेय शिक्षण संपवून, १५व्या वषीर् ते इंग्रजी आणि विज्ञानामध्ये पदवीधर झाले तर १७व्या वषीर्च फिजिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षणही - मदासमध्ये - उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले. त्यानंतर कोलकाता येथे डेप्युटी अकौटंट जनरल पदावर रुजू झाले, पण या रुक्ष नोकरीमध्ये त्यांचे मन रमेना, म्हणून कोलकाता येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून - कमी पगारात - नोकरीत रुजू झाले. १९२१मध्ये कलकत्ता विद्यापीठातफेर् त्यांना ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. यावेळी त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये 'भारतीय तंतूवाद्ये' हा शोधनिबंध सादर केला. पुढे १९३५मध्ये 'भारतीय चर्मवाद्ये' विशेष करून तबल्याच्या नादनिमिर्ती, तबल्याची पुडी, शाई, तरंगलांबी इत्यादींवर संशोधन केले.

युरोपातून समुदमागेर् भारतात परत येत असताना आकाशातील निळ्या रंगाने त्यांचे कुतूहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचे का दिसते? अशा प्रश्नामधून त्यांचे संशोधन सुरू झाले. त्यामधूनच त्यांनी भारतात परत आल्यावर - पाणी, बर्फ यांमधून प्रकाशाचे विकिरण (स्कॅटरिंग) यावर संशोधन सुरू केले. यातूनच त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाची उत्तरे मिळाली!

रामन इफेक्ट म्हणजे एक प्रकारचे प्रकाशाचे विकिरणच! प्रकाशाचे विकिरण हा एक दृश्य परिणाम आहे. अशा प्रकाशाचे किरण सरळ - जेव्हा आपल्या डोळ्यांत शिरतात, तेव्हाच आपल्याला प्रकाशाच्या अस्तित्वाची जाणीव होते. रामन हे सुरुवातीला स्फटिकांच्या अणुरचनेसंबंधी आढळणाऱ्या रचना सार्धम्याशी अपवादात्मक असा अभ्यास करत होते. या दरम्यान १९२८मध्ये त्यांना असे आढळले की, विकिरीत प्रकाशामध्ये मूळ प्रकाशाइतक्या, तरंगलांबीच्या किरणांबरोबर इतरही प्रकाशकिरणांचे अस्तित्व असते, ज्यांचा मागमूसही मूळ प्रकाशकिरणांमध्ये नव्हता. या नवीन किरणांचा जास्त अचूक अभ्यास करण्यासाठी त्यांनी - पाऱ्याच्या विद्युतदीपाघटापासून मिळणारी तरंगलांबी अभ्यासली. आणि त्यातूनच त्यांच्या नवीन निष्कर्षाला, संशोधनाला बळकटी आली. प्रकाशामध्ये कण स्वरूपाशी सार्धम्य सांगणारे काही गुणधर्म असतात, त्याच्या प्रकाश कणिकांमधील ऊर्जा ही त्या प्रकाशाच्या कंपनसंख्येच्या समप्रमाणात असते. रामन इफेक्टच्या या शोधामुळे - आश्चर्यकारक अशा लपलेल्या या वर्णरेषा - मूळ प्रकाशाच्या वर्णरेषेबरोबरच ओढून बाहेर काढल्या जातात आणि दृश्यमान होतात.

या अत्यंत मौलिक, अनमोल अशा संशोधनामुळे - विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधीचे, रचनेसंबंधीचे माहितीचे भांडारच खुले झाले, त्यामुळे अणुंप्रमाणेच, रेणुंचेही रामन वर्णपट काढता येतात, आणि रेणूंची रचना, तसेच अतिनील पट्ट्यातील रेषांचाही अभ्यास करता येऊ शकतो. तसेच दव वायुरूप पदार्थांमध्ये होणाऱ्या विकिरणाचाही अभ्यास सहजसाध्य झाला, आणि रासायनिक रेणूंची रचना समजण्यासाठी रामन परिणामाचा खूप उपयोग झाला. रामन इफेक्टच्या संशोधनानंतर केवळ दहा वर्षांमध्ये, दोन हजारहून अधिक संयुगांची रचना - रामन परिणामामुळेच - त्याच्या साह्याने निश्चित करता येणे शक्य झाले. लेसर किरणांच्या क्रांतिकारी शोधानंतर रामन इफेक्ट - हे शास्त्रज्ञांच्या हातातील एक महत्त्वपूर्ण घटक ठरले.

भारतातील १७ विद्यापीठांनी, तर जगातील विद्यापीठांनी रामन यांना सन्माननीय डॉक्टरेट- फेलोशिप सन्मानपूर्वक बहाल केली. १९४३मध्ये रामन यांनी बंगलोर येथे 'रामन संशोधन संस्थे'ची स्थापना केली. आणि सुमारे ३५० शोधनिबंध सादर केले. २१ नोव्हेंबर १९७० रोजी निधन होईपर्यंत ते संशोधनात मग्न होते.

' रामन इफेक्ट' संशोधनासाठी रामन यांनी केवळ २०० रु. (फक्त रु. दोनशे)ची साधनसामुग्री वापरली होती हे विशेष! तर आज रामन परिणामाचा प्रगत अभ्यास करण्यासाठी लक्षावधी डॉलर्सची साधने वापरली जातात. साधारणपणे मूलभूत संशोधक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, वैज्ञानिक अशी वेगवेगळी वर्गवारी असणारे - तीन प्रकारचे तज्ञ कार्यरत असतात. मात्र रामन हे स्वत: आपले सिद्धांत, संशोधन पडताळून पाहण्यासाठी - विविध यंत्र निमिर्त्व करून अभ्यास करत असत!


गेल्या काही दशकांतील भारताची वैज्ञानिक गरुडझेप अभिमानास्पदच आहे. परंतु विज्ञान-तंत्रज्ञानाची ही भरारी आणि एकूणच वैज्ञानिक दृष्टिकोन संपूर्ण मानवजातीच्या, विशेषत: 100 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतीय जनतेच्या पचनी पडलेला दिसत नाही. एकीकडे विज्ञानाने घडवून आणलेलेचमत्कारतो स्वत:च्या डोळ्यांनी पाहतो. त्याची कारणमीमांसा समजण्याचा प्रयत्न करून गुणगानही करतो तर दुसरीकडे अंधश्रद्धा, चमत्कार, बुवाबाजी तसंच पुरातन काळापासून चालत आलेल्या भ्रामक समजुती, अनिष्ट आणि अनावश्यक प्रथा सोडून द्यायला मात्र तयार नसतो. ‘ग्रहणहे यासंबंधीचं अतिशय उत्तम उदाहरण सांगता येईल.
वास्तविक ग्रहण म्हणज चंद्र, सूर्य, पृथ्वी या तीन अवकाशीय घटकांच्या सावल्यांचा खेळ! भारतासारख्या देशांमध्ये केवळ एक-दोन टक्के लोकच हे ग्रहण प्रत्यक्ष ग्रहणपट्टय़ामध्ये जाऊन अनुभवतात. सूर्यग्रहणाचाहा अप्रतिमनैसर्गिक देखावा प्रत्यक्ष पाहण्याऐवजी नदीवर डुबकी मारत बसून पापक्षालन करत बसणा-यांची संख्या खूप मोठी आहे. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन(scientific attitude) हा शब्दप्रयोग आपल्याला नवीन नाही. पण केवळ विज्ञान, गणित अशा विषयांच्या अभ्यासकांपुरती या शब्दाची व्याप्ती मर्यादित ठेवण्याची चूक केली जाते. ज्ञान-विज्ञान, वैज्ञानिक सिद्धांत, सूत्र अशा किचकट गोष्टींशी सर्वसामान्यांचा संबंध फक्त शालेय अभ्यासक्रमापुरताच आणि तोही पास होण्यापुरताच असतोअसा सूर आपल्याला साधारणपणे ऐकायला मिळतो. पण ही अनास्था चांगली नाही. आयझॉक न्यूटनने सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहिलं आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पण गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या निर्मितीपासूनच अस्तित्वात होतं आणि सफरचंदाप्रमाणे इतरही वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे वरून खाली पडतच होत्या. मात्र सफरचंद पडण्याच्या क्रियेच्या निरीक्षणातून न्यूटनच्या मनात विचारचक्र सुरू झालं. अर्थात सफरचंद पडताना इतरही साऱ्यांनी पाहिलंच असणार. मात्र न्यूटनला त्याचीजाणीवझाली आणि त्याच्या तार्किक, तात्त्विक, सखोल अभ्यासातून गुरुत्वाकर्षणाचा वैज्ञानिक सिद्धांत पुढे आला. कोणतीही क्रिया अतक्र्य, अज्ञात शक्तींमुळे घडून येत नाही, तर त्यामागे निश्चित असा कार्यकारणभाव असतो, अशी जाणीव होणं म्हणजेचं वैज्ञानिक दृष्टिकोन होय 
वैज्ञानिक दृष्टिकोनहा तात्त्विक, तर्कशुद्ध विचारांच्या कारणमीमांसेवर आधारित असतो. तो अर्थाअर्थी शिक्षण आणि विज्ञानावर अवलंबून नसतो. आपल्याकडील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा जोतीबा फुले, संत गाडगेबाबा असे अनेक थोर भारतीय विचारवंत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते होते. ‘विज्ञानवाही अर्थात सखोल विचार चिंतनासाठी विज्ञान शिक्षणच हवं असं नाही. फक्त विज्ञान शिक्षणामुळे गणिती सूत्रांचं आकलन होऊ शकतं. मात्र, वैज्ञानिक-तात्त्विक विचार बैठकीमुळे अंधश्रद्धांचे ढग आपले आपणच स्वत:हून बाजूला काढू शकतो आणि म्हणूनच विज्ञानाची व्याख्या म्हणजे एखाद्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध- सर्वागीण सखोल अभ्यास करून विशेष ज्ञान मिळवणं, अशी करता येते. अर्थात विज्ञान हे यंत्र आहे, विचारांचे उपकरण आहे. आपल्याला कुतूहलापोटी, जिज्ञासेपोटी वाटणारी प्रत्येक गोष्ट या वैचारिक-तार्किक यंत्रात घालून याबद्दलची माहिती-ओळख आपण मिळवू शकतो. तसं पाहता विज्ञानाच्या आधी निसर्गाची निर्मिती झाली होती. त्या निसर्गाच्या विविध रूपांत मानवाने बुद्धिमत्तेच्या जोरावर काही कार्यकारणभाव उत्पन्न केला. आणि याच बुद्धिमत्तेच्या कसोटीवर ताडून पाहणा-या आविष्काराला विज्ञान, असं संबोधित केलं.समाजामध्ये व्यापक प्रमाणात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हा अंधश्रद्धेवरील उपाय आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. वास्तविक पाहता वैज्ञानिक दृष्टिकोनांचा मूलभूत पाया श्रद्धा हाच असतो. अर्थात ही श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर तार्किक विचारांवर असलेला ठाम विश्वास होय. मात्र देवाधर्मावर श्रद्धा ठेवता आधुनिकतेचा आव आणणं म्हणजे तथाकथित वैज्ञानिक दृष्टिकोन, असा भ्रम साधारणत: सर्वसामान्यांमध्ये असतो. देवाधर्मावर विश्वास असणं ही बाब वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याश्रद्धाया मूलाधाराला मारक नसली तरी गंडेदोरे, तंत्रमंत्र, बुवाबाजी करणा-या भोंदू साधू वगैरेंवर योग्य ताशेरे ओढून अंधश्रद्धा दूर करण्याच्या दृष्टिकोनातून समाजप्रबोधन होणं आवश्यक असतं.
महान पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ आल्बर्ट आइनस्टाइन यांच्यामते, आपल्या भौतिक जगातील शास्त्रज्ञ म्हणजेच वास्तविक कळकळीनेअध्यात्माचा अभ्यास करणारीच माणसं आहेत. ते नेहमीच वेगवेगळ्या प्रश्नांवरील उत्तरांच्या शोधात असतात. सर्वसामान्यांच्या दृष्टीने एखादा चमत्कार घडत असेल तर संशोधकांसाठी ती एक पर्वणी असते. त्यांच्या संशोधनवृत्तीसाठी ते एक प्रकारचं आव्हान असतं. कारण हे चमत्कार खोटे ठरले तर त्यांच्या दुष्परिणामांपासून समाजाची मुक्तता होणार असते आणि विज्ञानाच्या कसोटीवर ते अस्सल ठरल्यास (त्यामागचा कार्यकारणभाव स्पष्ट झाल्यास) वैज्ञानिक प्रगतीसाठी, संशोधनासाठी झेप घेण्यासाठी चांगली संधी मिळते. या चमत्कारामागील कारण संशोधनातून समाजाची प्रगती तर होईल. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्यांनी अशा रूढी-चमत्कारांचा, अंधश्रद्धाचा समाजाला वैज्ञानिक तर्क सुसंगत अशी कारणमीमांसा देऊन नायनाट केला पाहिजे. तरच तो -या अर्थाने दिव्य दृष्टिकोन ठरेल आणि देशाच्या सर्वागीण प्रगतीला हितकारक ठरेल.
आज भारतीय विज्ञान दिवस. सी व्ही रामन यांनी याच दिवशी आपला शोध जाहीर केला होता त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो.
गेल्या अनेक वर्षात विविध सामाजिक कार्यकर्ते, नेते, विचारवंत, लेखक कित्येक अनाम नागरिकांमुळे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व जनमानसात रुजू लागले आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक समजुती, प्रथा, सवयी या 'अवैज्ञानिक' म्हणता याव्यात. विविध क्षेत्रातील माणसाचे निसर्गनियमां विषयीचे अज्ञान, विज्ञान त्यावर आधारित तंत्रज्ञानाने दूर होऊ लागले तसतसे काही समज दूर झाले मात्र काही अजूनही तग धरून आहेत. एकेकाळी ग्रहण बघणे सोडाच त्याकाळी घराबाहेर पडणे वर्ज्य होते आता ग्रहण बघण्यासाठी मेळावे भरत असले तरी तितकावेळ उपास धरणारेही काही कमी नाहीत. मांजर आडवी गेल्यावर चार पावले मागे जाणारे क्वचित असले तरी भेटतात.
आज या दिनानिमित्त चर्चाविषय यासाठीच आहे. आतापर्यंत अनेक अश्या गोष्टी असतील ज्या तुम्ही अज्ञानामुळे अथवा परंपरेने केल्या असतील ज्या पुढे तुम्हाला त्यामागचे सत्य समजल्यावर थांबवल्या असतील. शिवाय काही गोष्टी तुम्ही अश्या केल्या असतील ज्यामुळे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या शेजाराला, तुमच्या इमारतीला, तुमच्या परिसराला तुम्ही वैज्ञानिक शोधांचा, दृष्टिकोनाचा आधार घेऊन फायदा झाला असेल. तर त्या गोष्टी इथे द्या जेणे करून इतरांना त्या माहीतही होतील त्या करूनही पाहता येतील
  • तुम्ही वैज्ञानिक सत्य कळल्यावर कोणत्या सवयी बदलल्या आहेत काय? किंवा कोणत्या क्रिया करणे बंद केले आहे काय?
  • सध्या अश्या कोणत्या क्रिया आहेत काय ज्या तुम्हाला बदलायच्या तर आहेत पण कौटुंबिक/सामाजिक कारणाने त्या वैज्ञानिक दृष्टीने करायचा धीर होत नाहीये?
  • तुम्ही अश्या काही गोष्टी केल्या आहेत का ज्यांच्यामुळे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या शेजाराला, तुमच्या इमारतीला, तुमच्या परिसराला वैज्ञानिक शोधांचा, दृष्टिकोनाचा आधार घेऊन फायदा झाला आहे? असल्यास त्याबद्दल विस्ताराने लिहावे
  • तुम्हाला असे काही प्रकल्प माहीत आहेत का ज्यामुळे समाजाला अवैज्ञानिक गोष्टींपासून दूर व्हायला अधिक फायदा होईल?
  • तुम्ही तुमच्या पाल्यांमध्ये / इतर ओळखीच्या लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी काही करता का? असल्यास काय? नसल्यास का? आणि हो! भारतीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा! (स्माईल)